वैभववाडी प्रशासनाचे चोरट्यांना अभय ? की चोरीच्या घटना घडल्यानंतर मान वर करणार प्रशासनाचा तीसरा डोळा
वैभववाडी (प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षांपूर्वी वैभववाडी शहरात दिवसा ढवळ्या चोरीच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन व पोलिस प्रशासनाने तातडीने शहरातील प्रत्येक चौकात अनेक सीसीटीव्ही बसविले होते व संपूर्ण शहरावर पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनाचे लक्ष होते. वैभववाडी शहरात गेल्या काही वर्षांत बंद घरे अज्ञातांनी फोडली असल्याच्या अनेक घटना ज्ञात असताना देखील वैभववाडी स्थानिक प्रशासन व पोलीस ठाण्याच्या वतीने अगदी वैभववाडी शहराच्या नेहमीच गजबजलेल्या नगरपंचायत समोरील चौकात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आजची स्थिती पाहता कंट्रोल रूम मध्ये नेमके स्थानिक प्रशासन या सी.सी.टिव्ही मधून काय पहात आहे ? असा प्रश्न पाहणाऱ्याच्या मनात आल्याशिवाय रहात नाही. सध्याची शहरातील या सी.सी.टिव्हीची स्थिती पहाता ते कार्यान्वित आहेत का ? हा ही प्रश्न उपस्थित होत असून चोरट्यांना प्रशासनाचेच अभय आहे की स्थानिक प्रशासनाने केलेला कानाडोळा भविष्यात पुन्हा शहरात चोरीच्या घटना घडू लागल्या की भानावर येऊन हा तिसरा डोळा उघडणार का ? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहेत.
वैभववाडी शहरातल्या सीसीटिव्ही यंत्रणेकडे प्रशासनाचा कानाडोळा












