खारेपाटण (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुरगावणे-बेर्ले ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच व कट्टर राणे समर्थक संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे यांच्या वतीने नुकतेच येथील कुरगावणे व बेर्ले जि. प. प्राथमिक शाळा मधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी उपसरपंच बाबला गोसावी, ग्रामपंचायत सदस्य बबलू पवार, बाबू गोठणकर, राजेंद्र लाड व शाळेचे सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. यावेळी आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांच्या शुभहस्ते खाऊ वाटप करून आमदार निलेश राणे यांच्या राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.













