खारेपाटण (प्रतिनिधी) : तरेळे पंचायत समिती विभाग भाजपा शक्तीकेंद्र प्रमुखपदी नुकतीच भाजप कार्यकर्ते शैलेश सुर्वे यांची निवड करण्यात आली असून याचबरोबर तरेळे बाजारपेठ बूथ प्रमुख पदी अनिरुद्ध महाडिक तर औदुंबरनगर बूथ प्रमुख पदी निलेश सोरप यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
तळेरे पंचायत समितीचे विद्यमान पं. स. सदस्य राजेश जाधव यांच्या शुभ हस्ते सदर कार्यकर्त्यांना भाजप पक्षाच्या वतीने नुकतीच नियुक्ती पत्र देण्यात आली. यावेळी कणकवली तालुका भाजप अध्यक्ष दिलीप तळेकर, पडेल मंडल अध्यक्ष बंड्या नारकर, मिठबाव सरपंच भाई नरे, वैभववाडी माजी सभापती बंड्या मांजरेकर, कणकवली विधानसभा सोशल मीडिया संयोजक मयुरेश लिंगायत, माजी सरपंच उदय बारस्कर, चिन्मय तळेकर, माजी उपसरपंच मंगेश कांबळे, बाळा कदम, दिनेश मुद्रस, सागर डंबे, बाली तळेकर, वैभव कांबळे, बंड्या मेस्त्री, सुयोग तळेकर, रवी गुरव आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.










