डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूलच्या अनुराग सचिन महिंद्र याचे उल्लेखनीय यश

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या वतीने नोव्हेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ न. म. विद्यालय खारेपाटणचा विद्यार्थी अनुराग सचिन महिंद्रे याने घवघवीत यश संपादित केले असून त्याच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

ही स्पर्धा राज्यातील महत्त्वाची समजली जाणारी स्पर्धा असून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन तर्कशक्ती आणि प्रयोगांच्या कौशल्याची कसोटी पाहणारी असते. खारेपाटण हायस्कूलचा विद्यार्थी अनुराग यांच्या या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष रघुनाथ राणे, सचिव महेश कोळसुलकर, सर्व विश्वस्त प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, शिक्षक वृंद यांचे कडून विशेष अभिनंदन करण्यात आले. तर संपूर्ण शाळेच्या शिक्षकांच्या वतीने नुकताच त्याचा शाळेत सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!