खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुसबे, पोखरण,कसाल गावात विकास कामांचा धडाका

५१ लाख रुपयांच्या विकास कामांची भूमिपूजने; ग्रामस्थांनी मानले आभार

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुसबे, पोखरण, कसाल या गावातील ५१ लाख रुपयांच्या विकास कामांची भूमिपूजने आज खा.विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांच्या मागणीवरून ही विकास कामे मंजूर करण्यात आली असून त्याबद्दल खा.विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांचे आभार मानण्यात आले.

     त्यामध्ये  कुसबे मुख्य रस्ता ते नामदेव घाडीगावकर यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख, जि.प.प्राथमिक शाळा कुसबे दुरुस्ती करणे निधी ७ लाख, कुसबे मुख्य रस्ता ते नामदेव घाडीगावकर यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर संरक्षण भिंत बांधणे निधी ८ लाख, कसाल मेस्त्रीवाडी ते गोसावी मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख 

       पोखरण धनगरवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ८ लाख, पोखरण धनगरवाड़ी येथे स्मशानभुमी येथे बोअरवेल खोदणे १ लाख, पोखरण जि.प.प्राथ. शाळा नं.१ येथे सभामंडप बांधणे १० लाख, पोखरण खालचीवाडी टेंबवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख  पोखरण जल जीवन मिशन अंतर्गत नळयोजना करणे १.४६ लाख हि कामे मंजूर करण्यात आली आहेत. 

      कुसबे येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी महापौर विश्वनाथ म्हाडेश्वर, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे,उपतालुकाप्रमुख सचिन कदम, शाखा प्रमुख राजू घाडीगावकर, सरपंच समीक्षा जाधव, उपसरपंच भाग्यश्री घाडीगावकर,ग्रा. प. सदस्य विजय म्हाडेश्वर, आबा मुंज, कुंदे सरपंच रुपेश तायशेटे, भाई म्हाडेश्वर, पांडुरंग तानीवडे, ललित घाडीगावकर, नितीन म्हाडेश्वर, सखाराम घाडीगावकर, विरेश परब, चंद्रकांत घाडीगावकर,सत्यविजय घाडीगावकर, मारुती ताम्हाणेकर,रामचंद्र पिळणकर आदी. 
     कसाल येथे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,सरपंच राजन परब, अवधूत मालणकर, यशवंत परब, डॉ. बालम, बाळा कांदळकर, पांडुरंग गावडे, गणेश मेस्त्री, अरुण राणे, गिरीश मर्तल, प्रभाकर सावंत, सत्यवान चव्हाण आदी. 
     पोखरण येथे रवी पांगम,शाखाप्रमुख संतोष सावंत,अनिल सावंत,जगदीश सावंत,ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत, संजना सुतार,सविता सावंत, रुपाली गावडे,संदीप गावडे,रमाकांत सावंत,विठ्ठल येडगे, आनंद गावडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!