वैश्य समाज कणकवलीच्या वतीने दादा कुडतरकर यांचा भव्य सत्कार,मुख्य सल्लागार पदी नेमणूक

वैश्य समाज कणकवली तालुकाध्यक्षपदी महेंद्रकुमार मुरकर,सेक्रेटरी गुरुनाथ पावसकर

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुका वैश्य समाज संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मावळते तालुकाध्यक्ष दादा कुडतरकर यांनी आपल्या कारकिर्दीत राबवलेल्या समाजोपयोगी विविध उपक्रमांबद्दल भव्य सत्कार करण्यात आला.दरम्यान पुढील 3 वर्षांसाठी नूतन तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली असून तालुकाध्यक्ष पदी महेंद्र मुरकर,सचिवपदी गुरू पावसकर तसेच उपाध्यक्ष लहू पिळणकर, कोषाध्यक्ष विलास कोरगावकर,सदस्यपदी सर्वश्री राजन पारकर,प्रसाद अंधारी,उमेश वाळके,सुनील पारकर,नंदकुमार काणेकर, नीलम धडाम, शीतल सापळे तर सल्लागार पदी सर्वश्री दादा कुडतरकर, दीपक अंधारी,आनंद अंधारी,राजेश सापळे,नागेश मोरये नांदगाव,श्रीकृष्ण नानचे फोंडाघट,प्रकाश पारकर बुवा कासारडे यांची सरवानुमते निवड करणेत आली, वैश्य समाज कणकवली या संस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा येथील विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे दादा कुडतरकर यांचे अध्यक्षते खाली सायंकाळी 4 ते 6 या दरम्यान संपन्न झाली,सभेत अजेंड्यापर सर्व विषय हातालणेत आले,यावेळी काशी पदयात्री अन 75 वर्षावरील वैश्य समाजातील बांधवांचे शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करणेत आले,यावेळी आनंद अंधारी यांनी वैश्य समाज कणकवली यांना वैश्य भवन कणकवली साठी 1 एकर जागा विना मोबदला देणेची कबूल केलेने त्यांचा विशेष सत्कार करणेत आला,सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी त्यांचे 3 वर्षे कालावधीत खालीलप्रमाणे कार्य केलेने त्यांचा विशेष सत्कार करणेत आला.
1 वधुवरांची स्वप्ने सफल होणेसाठी,नाविन्यपूर्ण विचारांचे आदानप्रदान अन समाजुन्नत्ती यासाठी दिनांक 9 फेब्रुवारी 2020 रोजी भव्य वधुवर सोहळा अन स्नेह संमेलन,
2 कोरोना कालावधी असूनही सन 20-21 अन 21-22 मध्ये 10 वी 12वी मधील समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार
3 सन 20-21 मध्ये अतिवृष्टी कामी अवर्षण प्रवण भागातील सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फंडास रक्कम रु10000 वैश्य समाज द्वारा तहसीलदार कणकवली यांचेकडे आदा
4 जात पडताळणी कामी प्राथमिक जलद दाखले देणेसाठी प्रांताधिकारी कणकवली याना निवेदन
5 हल्दीपुर गुरुमठ द्वारा आयोजित 2 महिने चातुर्मास सोहोल्याचे आयोजन अन नियोजन यामद्ये सक्रिय योगदान, वैश्य समाज कणकवली द्वारा जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू अन सन्मानचिन्ह देऊन भव्य सत्कार,चातुर्मास सोहळा यशस्वी करून सर्व वैश्य समाजास अध्यात्मिकदृष्टया एकत्र आणनेची किमया
6 श्री श्री वामनाश्रम स्वामी यांचे 3500 किमी पदायात्रेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन काशी येथील सांगता समारंभात सर्वांच्या उपस्थितीसह अन सहकार्याने सक्रिय सहभाग
7 समाजातील सरपंच, उपसरपंच अन सदस्य यांचा सत्कार
8 पदयात्री अन 75 वर्षे वरील जेष्ठ समाज बांधवांचा सत्कार
9 सर्वांचे सहकार्याने समाज बांधवांच्या एकतेची मशाल पेटवून भेदभाव,मतभेद याना फाटा देऊन एकाच झेंड्याखाली आणण्याची पराकाष्ठा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!