पळसंब येथे ४ मे पासून धार्मिक कार्यक्रम!

आचरा (प्रतिनिधी) : पळसंब येथील श्री देव रवळनाथ पावणाई मंदिर मध्ये ४ मे रोजी उदक शांती कार्यक्रम होणार आहे. श्री .आई जयंती देवीच्या मंदिरामध्ये शुक्रवार ०५ मे ते ०८ मे या चार दिवसाच्या कालावधीमध्ये ऋग्वेद शाकल शाखेच्या संपूर्ण संहितेचे अभिषेकासह पारायण होणार आहे.

यामध्ये एकूण १०,५५२ मंत्र आहेत. या मंत्रांचा दररोज अखंड पाच ते सहा तास अभिषेक होणार आहे.
दररोज सकाळी साडेसहा ते दुपारी १२ -३०पर्यंत संततधार अभिषेक होणार आहे. यासाठी गोव्यातील शांकर पाठशाळेमधून ४ब्राह्मण पारायण करणार आहेत.

५ मे पासून ०३ दिवस रात्री ०९-३०वा.
ह.भ.प. अथर्व रामचंद्र बांदेकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम देखील होणार आहे.
७ मे रोजी गावातील सर्व भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होईल. तरी सर्व भजन मंडळानी याची नोंद घेवून आई जयंती चरणी आपली सेवा अर्पण करावी. या सर्व कार्यक्रमासाठी देवस्थान चे सर्व मानकरी गावातील सर्व रहिवाशी, महिला वर्ग, माहेरवाशीनी, मुबईकर चाकरमानी, मित्र परिवारा सहित सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे व श्रींच्या कृपा प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन
श्री. जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट पळसंब देवस्थान यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!