मंगेश लोके मित्रमंडळ व भाजप खांबाळे यांचे आयोजन; प्रा. सूर्यकांत लोखंडे यांचे मार्गदर्शन
वैभववाडी (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मंगेश लोके मित्रमंडळ व भारतीय जनता पार्टी, खांबाळे यांच्या वतीने दहावी व बारावी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी खांबाळे ग्रामपंचायत सभागृह येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत शिबिर होणार आहे. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण व करिअर निवडीबाबत मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात कोल्हापूर येथील प्रा. सूर्यकांत लोखंडे (माईंड ट्रेनर, मोटिवेशनल स्पीकर व मानसशास्त्र अभ्यासक) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने माजी सरपंच गणेश पवार आणि बूथ अध्यक्ष महेश चव्हाण यांनी केले आहे.











