सामाजिक कार्यकर्ते, राणे समर्थक रफिक नाईक यांचे आयोजन
खारेपाटण (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे 10 एप्रिल रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. खा. नारायण राणेंच्या अमृतमहोत्सवी पदार्पणनिमित्त खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कट्टर राणे समर्थक रफिक नाईक यांनी सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. खा राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रफिक नाईक यांनी उद्या 10 एप्रिल रोजी खारेपाटण सह पंचक्रोशीतील 10 शाळांतील 550 विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था केली आहे.खारेपाटण केंद्रशाळा, खारेपाटण बंदरगा उर्दू शाळा, काजिर्डे उर्दू शाळा, शेर्पे जि प शाळा, नडगिवे जि प शाळा, वारगाव जि प शाळा, शिडवणे जि प शाळा येथील विद्यार्थी व शिक्षकांसाठी भोजन व्यवस्था रफिक नाईक यांनी केली आहे.











