सुहास ठाकूर-देसाई यांचे प्रतिपादन
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त गोपुरीत चर्चासत्राचा कार्यक्रम
कणकवली (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात मोठ्या प्रमाणात जातीयता व विषमता होती. याविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा दिला. देश ब्रिटीशांच्या राजवटीतून स्वतंत्र्य झाल्यानंतर डॉ. आंबेडकर यांनी संविधान लिहून ते देशाला सर्मपित केले. समाजात असलेल्या विषमतेवर डॉ. आंबेडकरांनी आघात करून ही विषमता नष्ट करण्यासाठी स्वत:चे आयुष्य वेचले. डॉ. आंबेडकर हे विज्ञाननिष्ठ होते. अलीकडच्या काळात समाजात द्वेषपणा वाढीस लागला आहे. द्वेषाला खतपाणी घालणारी मंडळी डॉ. आंबेडकर यांना बदनाम करण्यासाठी कारस्थाने करीत आहेत, असे मत राष्टÑ सेवा दलाचे सुहास ठाकूर-देसाई यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्टÑ सेवा दल व गोपुरी आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने गोपुरीत चर्चासत्रांचे आयोजन केल होते. यात विज्ञाननिष्ठ भारत आणि आंबेडकर या विषयावरील चर्चासत्रात श्री. ठाकूर देसाई बोलत होते. या चर्चासत्रांच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट सेवा दलाच्या ज्येष्ठ साथी कमलताई परुळेकर, राष्टÑ सेवा दलाचे बाबासाहेब नदाफ, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर, राष्टÑ सेवा दलाचा जिल्हाध्यक्ष प्रवीण नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
बाबासाहेब नदाफ म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले. आपला देश संविधानावर चालत आहे. मात्र, देशावर सध्या धर्माध शक्तीचे सरकार असल्याने ही मंडळी संविधनाचे अस्तित्व नष्ट करून पुन्हा वर्ण व्यवस्था आणून पाहत आहेत. देशाला सर्वांत धोका धर्माध शक्तींचा आहे. त्यामुळे संविधानाला मानणाºयांनी धर्माध शक्तींना वेळीच रोखले पाहिजे. धर्माध शक्तीकडून देशातील नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये द्वेष फसरविला जात आहेत. हा द्वेष फोफावला तर भारत देश एकसंध राहणार नाही. त्यामुळे संविधानाला नख लावू पाहणाºयांचे मनसुबे देशातील जनतेने उधळून लावण्यासाठी लढा देणे गरजेचे आहे. संविधानविरोधात काम करणाºयांना रोखण्यासाठी भविष्यात संंविधानप्रेमींनी कृतीशील कार्यक्रम हाती घेऊन समाजात जनजागृती केली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राजेंद्र मुंबरकर म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशाला संविधान मिळाले. संविधान हे प्रत्येक नागरिकांचा आत्मसन्मान आहे. त्यामुळे संविधानाची माहिती नसलेल्यांना ती माहिती समजून सांगण्यासाठी संविधानप्रेमींनी पुढाकार घेतला पाहिजे, ही बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल. तरुण पिढीने डॉ. आंबेडकर यांना समजून घेतले पाहिजे. त्यांची पुस्तके आवर्जून वाचली पाहिजेत. आरंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. चर्चासत्राला व्ही. के. सावंत, संदीप सावंत, विनायक उर्फ बाळू मेस्त्री, अर्पिता मुंबरकर, पत्रकार तुषार हजारे, सहदेव पाटकर, सदाशिव राणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.












