खारेपाटण पंचशील नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उस्ताहात साजरी

भारतीय संविधान सर्वांच्या हक्काचे रक्षण करते – प्राची ईसवलकर

खारेपाटण (प्रतिनिधी) : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेला महान ग्रंथ भारतीय संविधान हे येथील महिलांसह सर्व आबाल वृद्धांच्या हक्कांचे रक्षण करते म्हणून ते सर्वश्रेष्ठ ठरते.असे भावपूर्ण उदगार जि.प.सदस्य प्राची ईसवलकर यांनी केली खारेपाटण बुद्धविहार येथे आयोजित करण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात बोलताना काढले.

खारेपाटण पंचशील नगर येथे स्थानिक पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मंगळावर दि.१४ एप्रिल २०२६ रोजी मंडळाचे अध्यक्ष भरत रघुनाथ पाटणकर यांच्या मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण च्या अध्यक्षा संकिता संतोष पाटणकर यांच्या शुभहस्ते पंचशील ध्वजारोहण करून करण्यात आली.

या कार्यक्रमाला जि.प. सदस्य प्राची ईसवलकर,पं.स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव माजी सरपंच रमाकांत राऊत,सोसायटीचे संचालक विजय देसाई,खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए डी कांबळे,खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज प्राचार्य संजय सानप,रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे अध्यक्ष देवानंद कोकाटे, खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ चे पदवीधर शिक्षक मिलिंद सरकटे,बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण चे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे,सचिव सचिन कोर्लेकर, खारेपाटण ग्रा.पं.सदस्य सुधाकर ढेकणे,क्षितिजा धुमाळे,मनाली होणाळे,दक्षता सुतार,तृप्ती गुरव,वनरक्षक कांबळे, खारेपाटण पोलिस पाटील अनिकेत जामसंडेकर,सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मांजरेकर ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटणकर,प्रकाश हेटम,अशोक पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पंचशील नगर येथील बुद्धविहारात सामुदायिक रित्या बौद्ध धम्म पूजा पाठ घेण्यात आला.यामध्ये सर्व नागरिकांना सहभाग घेतला.खारेपाटण पंचशील नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला जि.प.सदस्य प्राची ईसवलकर व पं.स.सदस्य गुरू शिंदे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी झालेल्या अभिवादन सभेत तृप्ती महेंद्र गुरव या ओबीसी महिला भगिनींने डॉ बाबासाहेब आंबडेकर यांचे सामाजिक विचारांची सुंदर मांडणी करत अभिवादन सभा गाजवली.यावेळी
सचिन कोर्लेकर,प्राचार्य डॉ ए डी कांबळे, प्राचार्य संजय सानप, पं.स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांनी देखील मार्गदर्शन केले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमा निमित्त महिलांसाठी विशेष रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व महिलांनी सहभाग घेतला होता.या रांगोळी स्पर्धेचे परीक्षण स्वप्नाली कांबळे यांनी केले.तर मुले व महिलांसाठी विविध फनी गेम घेण्यात आले यातील सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.यावेळी मंडळाचे कार्यकर्ते संतोष जुवाटकर, अमित पाटणकर,धीरज जुमलेकर, सौ आस्था पाटणकर,सायली तुरळकर,स्निग्धा पोमेडकर,दीक्षा पाटणकर,दीपिका गोवळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते व मंडळाचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी केले.तर आभार प्रदर्शन मंडळाचे उपाध्यक्ष संतोष तुरळकर यांनी मानले.

error: Content is protected !!