कनेडी हायस्कूल मध्ये १० जून रोजी

विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय विज्ञान संवादक केंद्र (National Centre for Science Communicators – NCSC), मुंबई यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी “करिअर गाईडन्स प्रोग्राम – Explore • Discover • Achieve” या विशेष करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवारी १० जून २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता माध्यमिक विद्या मंदिर, कनेडी येथे आयोजित करण्यात आला आहे. इयत्ता ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम खुला असून विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे. या मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, कृषीशास्त्र, गणित व सांख्यिकी तसेच अभियांत्रिकी या विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संशोधन, अवकाश विज्ञान, जैवतंत्रज्ञान, डेटा सायन्स, कृषी व्यवसाय, संगणकशास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान आदी क्षेत्रांतील संधींची माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या कार्यक्रमात अनुभवी तज्ज्ञ विद्यार्थ्यांशी संवाद साधून करिअर निवड, उच्च शिक्षण, शिष्यवृत्ती, संशोधन क्षेत्रातील संधी आणि भविष्यातील रोजगाराच्या दिशा याविषयी मार्गदर्शन करतील. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची तसेच वैयक्तिक शंकांचे निरसन करून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमात डॉ. चंद्रशेखर मराठे (भौतिकशास्त्र), डॉ. संजय भगवत (जीवशास्त्र व कृषीशास्त्र), परेश चिटणीस (संगणक व आयटी सुरक्षा) आणि सुहास नाईक-साटम (खगोलशास्त्र) हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष सतीश सावंत, चेअरमन आर. एच. सावंत यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
सुमंत दळवी – 9420206508
मुख्याध्यापक/ प्राचार्य
बयाजी बुराण 9421144605
पर्यवेक्षक
संदीप राणे 0420306306

नोंदणीसाठी : https://ln.run/BJ1KA

– राष्ट्रीय विज्ञान संवादक केंद्र (NCSC), मुंबई

error: Content is protected !!