प्रज्ञा परीक्षेची वेळ सकाळची-प्रितेश राऊळ

शिक्षक समितीची मागणी मान्य

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रज्ञा शोध परीक्षेची नियोजित दिवसभराची वेळ विद्यार्थ्याना उन्हाळ्याच्या दिवसात त्रासदायक असल्याने ती सकाळ सत्रात करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग यांनी शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांना निवेदनाद्वारे केली होती.त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत सभापती राऊळ यांनी सदर परीक्षेची वेळ सकाळ सत्रात करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले. सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता वाढलेली आहे. सकाळी ११ ते ३ अशी भर उन्हाची वेळ ही परीक्षेसाठी योग्य नसल्याने विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. याबाबत शिक्षक समिती सिंधुदुर्ग ने शिक्षण सभापती यांच्याशी चर्चा करून सकाळी नऊ ते साडेदहा आणि अकरा ते साडेबारा असे दोन पेपर घेण्यात यावे असे निश्चित करण्यात आले.या चर्चेमध्ये राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, पतपेढी संचालक नारायण नाईक, राज्य पदाधिकारी राजू वजराटकर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जावेद तांबोळी तसेच शिक्षक समिती पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!