महिला ओपन शुटिंग बॉल स्पर्धेत त्रिंबक हायस्कूल तृतीय…!

आचरा (प्रतिनिधी) : एव्हरग्रीन चॅलेंजर्स उगवे आयोजित गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील निमंत्रित महिला ओपन शूटिंग बॉल स्पर्धा रविवार 19 एप्रिल 2026 रोजी उगवे गोवा येथे संपन्न झाली. या स्पर्धेत गोवा आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यातील निमंत्रित संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेत मालवण तालुक्यातील जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेचा संघ चमकदार कामगिरी करत तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. विद्यार्थीनीं च्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अन्ना सकपाळ, उपाध्यक्ष अशोक बागवे, कार्यवाह अरविंद घाडी सर्व संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण घाडीगांवकर, एकनाथ गायकवाड, प्रशांत गोसावी, अभिजित धुरे सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ सर्वांनी अभिनंदन केले. यशस्वी संघाला क्रिडा शिक्षक महेंद्र वारंग, सुरेंद्र उर्फ अन्ना सकपाळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!