सिंधषूदूर्ग जिल्हा शास,निमशासकीय कर्मचारी पतपेढी

अध्यक्षपदी राजेश कुडाळकर तर उपाध्यक्षपदी वसंतराव पाटोळे यांची निवड

तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सह. बँक इत्यादी कर्मचारी सहकारी पतपेढी मर्या. सिंधुदुर्ग, अध्यक्षपदी राजेश वासुदेव कुडाळकर व उपाध्यक्षपदी वसंतराव मारुती पाटोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर पतपेढी मध्ये सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व विभागातील शासकीय निमशासकीय कर्मचारी सभासद आहेत. सर्व शासकीय निमशासकीय विभागातील कर्मचारी सभासद समाविष्ट करणारी ही सिंधुदुर्ग जिल्हयातील संस्था आहे. संस्थेची सन २०२५-२६ ते सन २०३०-३१ ची पंचवार्षिक निवडणूक एप्रिल २०२५ मध्ये संपन्न झाली. त्यावेळी १४ सदस्यांची बिनविरोध निवड झालेली होती. शुक्रवार दि. २४ एप्रिल २०२६ रोजी अध्यासी अधिकारी तुषार धों राणे यांच्या अध्यक्षतेखाली सदर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड संपन्न झाली. अध्यक्ष पदासाठी सुचक म्हणून संचालक प्रसाद नारायण कुंटे यांनी राजेश वासुदेव कुडाळकर यांचे नाव सुचविले तर संचालक शंकर अंकुश चव्हाण यांनी अनुमोदन दिले. तसेच उपाध्यक्ष पदासाठी सुचक म्हणून संचालक हेमंत प्रतापराव सावंत यांनी वसंतराव मारुती पाटोळे यांचे नाव सुचविले तर संचालक लक्ष्मण भरतसिंग वळवी यांनी अनुमोदन दिले. सदर पदांसाठी एक एकच अर्ज आले असल्याकारणाने सदर निवडीला सर्व संचालकांनी मंजुरी दिल्याने अध्यक्ष म्हणून राजेश कुडाळकर व उपाध्यक्ष म्हणून वसंतराव पाटोळे यांची अध्यासी अधिकारी राणे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. नुतन अध्यक्ष कुडाळकर व उपाध्यक्ष पाटोळे यांनी मनोगत व्यक्त करताना सर्व संचालकांना विश्वासात घेवुन संस्थेचे कामकाज सांभाळणार असल्याचे म्हटले. यावेळी उपस्थित संचालक प्रसाद कुंटे, विनयश्री पेडणेकर, संजय गावडे, दिलीप मसके, मंगेश राऊत, अर्जुन नाईक, दिनकर केळकर, लक्ष्मण वळवी, शंकर चव्हाण, शामराव बिरादार, हेमंत सावंत, प्रज्योत सावंत, उदय शिरोडकर, महेश गावडे, नितीन आरोंदेकर, सचिव रामचंद्र दळवी व कर्मचारी वृंद यांनी नुतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!