खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य एस. टी. महामंडळ पुरस्कृत व ग्रामपंचायत खारेपाटण यांच्या सौजन्याने खारेपाटण एस. टी. बस स्थानक येथे आज शनिवार दि.२५ रोजी प्रवाशांना एस टी सवलत पास व नवीन NCMC कार्ड काढून देण्याचा विशेष कॅम्प खारेपाटण जि. प. सदस्य प्राची ईसवलकर व खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. यावेळी खारेपाटण माजी सरपंच रामकांत राऊत, ग्रा. पं. सदस्य सुधाकर ढेकणे, स्थानिक ग्रामस्थ शिवाजी राऊत, भिकाजी धुमाळे, खारेपाटण एस. टी. बस स्थानक वाहतूक नियंत्रक प्रमुख महेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी एस. टी. महा मंडळाचे NCMC सवलत कार्ड वितरण करणारे प्रमुख सत्यवान आळवे यांचा जि. प. सदस्य प्राची ईसवलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व या कॅम्पला सुरवात करण्यात आली. महाराष्ट्र राज्य एस. टी. महामंडळाच्या वतीने सर्व प्रकाराच्या प्रवासी वर्गाला अनेक सवलतीचे पास वितरीत करण्यासाठी व सर्व सेवांना एकच स्मार्ट कार्ड देण्यासाठी या विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक (अमृत योजना),६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना (५० % सवलत ), सर्व विद्यार्थी (शाळा आणि महाविद्यालय शैशणिक प्रवासी पास योजना ),दिव्यांग व्यक्ती आणि पत्रकार मित्र सवलत योजना यांचा यामध्ये सबेश होता. खारेपाटण एस.टी बस स्थानक येथे घेण्यात आलेल्या या कॅम्पमध्ये सुमारे १२५ नागरिकांनी आपली ऑनलाइन नोंदणी करून एस टी महामंडळाच्या विविध सेवा सुविधांचा लाभ घेतला.
खारेपाटण एस. टी. बसस्थानक येथे एस. टी. सवलत NCMC कार्ड कॅम्प संपन्न











