सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा शनिवार दि. २५ एप्रिल व रविवार दि. २६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आला असून, या दौऱ्यात विविध सामाजिक, राजकीय व पर्यटनस्थळांना भेटी देण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. शनिवार दि. २५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता देवगड येथील भाजप कार्यालयात त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर सायं. ५:३० वाजता माजी आमदार अजित गोगटे यांच्या निवासस्थानी भेट देण्यात येईल. सायं. ६ वाजता देवगड पवनचक्की गार्डन येथे भेट तर रात्री ८ वाजता देवगड नाट्य महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. रविवार दि. २६ एप्रिल रोजी सकाळी ९:३० वाजता क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात होणार आहे. सकाळी १०:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण व स्वागत कार्यक्रम होईल. सकाळी ११ वाजता कणकवली येथील प्रहार भवनात भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १ वाजता कणकवली येथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर दुपारी ३ वाजता मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देत पर्यटकांशी संवाद साधला जाईल. सायं. ५ वाजता राजकोट किल्ला भेट आणि सायं. ६ वाजता मालवण येथील रॉक गार्डन येथे ‘कॉफी विथ इन्फ्लुएंसर्स’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यातून युवा मोर्चाच्या माध्यमातून स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटन अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार असल्याचे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी सांगितले.
भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक सिंधुदुर्ग दौऱ्यावर












