साळीस्ते ग्रामपंचायतीच्या वतीने ग्राम विकास अधिकारी विशाल वरवडेकर यांचा सत्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साळीस्ते गावातील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विशाल रविकांत वरवडेकर यांना नुकताच तळकोकणचे अग्रणी न्यूज चॅनेल आपला सिंधुदुर्ग न्यूज चा आदर्श ग्राम विकास अधिकारी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल साळीस्ते ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसेवक श्री. वरवडेकर यांचा ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच प्रभाकर ताम्हणकर यांचे हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी साळीस्ते उपसरपंच महेंद्र गुरव, ग्रामपंचायत सदस्य मंगेश कांबळे, मानसी बारस्कर, हर्षदा ताम्हणकर व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडेकर यांचा नुकताच प्रिंट मिडिया चॅनल आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज च्या वतीने आदर्श ग्रामसेवक अधिकारी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. याची दखल घेत साळीस्ते ग्रामपंचायतीने देखील वरवडेकर यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!