नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार : ना. नितेश राणे

चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या सावंतवाडीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : चक्रीवादळामुळे गुरुवारी मध्यरात्री सावंतवाडी शहरात झालेल्या नुकसानीची राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास प्रत्यक्ष नुकसानीच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली. झालेली नुकसानी ही खूपच मोठी असून वेळ पडल्यास निकष बदलून नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार अशी ग्वाही त्यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सावंतवाडीच्या नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोंसले, उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, लखमराजे भोसले, तहसीलदार श्रीधर पाटील, नगरपरिषदेचे सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, माजी नगरसेवक उदय नाईक, दिलीप भालेकर, अर्चित पोकळे, एसपीकेचे प्राचार्य डि. के. भारमल अन्य प्राध्यापक यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!