चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी खुशी उत्तम जाधव हिने एन. एम. एम. एस. परीक्षेमध्ये नेत्र दीपक यश संपादन करीत शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. एन. एम. एम. एस. परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून खुशी जाधव हिने एस. सी. प्रवर्गातून जिल्ह्यात अकरावा क्रमांक प्राप्त केला आहे. तिच्या या यशाबद्दल चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे अध्यक्ष जगदीश परब, स्थानिक समिति अध्यक्ष बिजेंद्र गावडे, मुख्याध्यापिका रसिका गोसावी मॅडम, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
चौके हायस्कूलची खुशी जाधव एन. एम. एम. एस. परीक्षेत जिल्ह्यात ११वी












