देवगड निपाणी रस्त्यावरील फोंडाघाट मध्ये हेवी अवजड वाहनांची वाहतूक शनिवार रात्रीपासून बंद राहणार ?

नवनिर्वाचित जि. प. सदस्य राजन चिके यांच्या  पाठपुराव्याला यश ! नागरिकांमधून समाधान !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : गेल्या दोन दिवसात अवजड वाहनाखाली, होणाऱ्या परंतु सुदैवाने बचावलेल्या अपघाताची गांभीर्याने दखल घेऊन, जि. प. सदस्य राजन चीके यांनी पोलीस प्रशासन यांना अवजड वाहतूक त्वरित बंद करावी अशी ग्रामस्थांची आग्रही मागणी केली होती. अन्यथा ग्रामस्थांसह  रस्त्यावर उतरून वाहतूक बंद करू असेही सांगितले होते. आज सायंकाळी कणकवली पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक नलावडे यांचे मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली.यावेळी जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक अरिफा मुल्ला, चिरे वाहतूक संघटनेचे संजय नकाशे  महामार्ग पोलीस उपनिरीक्षक संतोष राठोड  ठेकेदार ए.पी सावंत, वाहतूक पोलीस संदेश आबिटकर आणि जी. प.सदस्य राजन चिके उपस्थित होते ..

या वादातीत वाहतुकीवर सर्वमान्य चर्चा होऊन, कणकवली – फोंडा – कोल्हापूर रस्ता एसटी वाहतूक वगळून, अवजड वाहनांसाठी पोलिसांच्या निगराणीखाली पूर्णपणे बंद ठेवण्याचे सर्वांनी मान्य केले. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे पर्यायी मार्गाने वाहतूक चालू ठेवण्याचे सांगितले. ठेकेदाराकडून लगतचे दुकानदार – ग्रामस्थ- विद्यार्थी यांना कोणताही त्रास होणार नाही. धुळीकरता दिवसातून सातत्याने पाणी फवारणी करावी. अशी भूमिका घेऊन राजन चिके यांनी सोमवार पर्यंत प्रशासन जड वाहतूक बंद ठेवण्यासाठी असे नियोजन करते हे तपासून अथवा ग्रामस्थांसह जड वाहतूक बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे

error: Content is protected !!