शिरोलीत लव्ह जिहादच्या संशयावरून तणाव; संशयितांच्या घरांवर बुलडोजरची मागणी

‘लव्ह जिहाद सहन करणार नाही’ – माजी सरपंचांचा इशारा, संतप्त कार्यकर्ते आक्रमक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील समीर सनदे याचे एका तरुणी सोबत प्रेम प्रकरण होते. सनदे याने त्या युवतीवर अत्याचार करुन त्याचे व्हिडीओ मित्रांना शेअर केले. त्यानंतर पिडीत युवतीने सनदे याच्या विरोधात राजारामपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सनदे याला अटक केली आहे. त्याला हातकणंगले पोलिसांकडे सोपवल्यानंतर त्याठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी त्याला पेठवडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सनदेकडे पिडीतेच्या आठ ते दहा मैत्रिणींचे सुध्दा अश्लील व्हिडीओ असल्याचा पोलिसांचा संशय आहे. अश्लील व्हिडीओ तयार करणारा सनदेचा मित्र शाहरुख देसाई हा पसार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून या संघटनांनी आज गाव बंदची हाक दिली होती. त्यानुसार मुख्य प्रवेश द्वाराजवळ कार्यकर्ते एकत्र आले होते. कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कार्यकर्त्यांना प्रवेशद्वाराजवळ रोखले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. संतप्त कार्यकर्त्यांनी संशयितांच्या घरावर बुलडोजर फिरवा, त्याला गावातून हद्दपार करा अशा मागण्या केल्या हिंदू मुलींवर अत्याचार करणाऱ्या लोकांच्या घरावर बुलडोझर फिरवा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी केली अशा लोकांविरोधात आम्ही कायदा हातात घेऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे. गावात लव्ह जिहादसारखे प्रकरण खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा माजी सरपंच शशिकांत खवरे दिला आहे. ग्रामपंचायतीने संशयितांच्या घराचे पाणी कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतला असून कार्यकर्त्यांनी शांततेच्या मागनि आंदोलन करावे, असे आवाहन सरपंच पद्मजा करपे यांनी केले आहे. या घटनेनंतर गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

error: Content is protected !!