सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल आयोजित 19 वर्षाखालील खुली व मुली निवड चाचणी स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : 15 मे ते 17 मे 2026 रोजी पुणे येथे होणाऱ्या 19 वर्षाखालील खुली व मुली राज्य निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल यांच्यावतीने जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा दिनांक 1 मे रोजी कणकवली येथे लक्ष्मी विष्णू हॉल मध्ये सकाळी 11 ते 5 या वेळेत घेण्यात येणार आहे. सदर निवड चाचणी मध्ये भाग घेण्यासाठी प्रवेश शुल्क 200 राहील. स्पर्धा खुली व मुली या दोन गटात खेळविली जाईल. दोन्ही गटातून प्रत्येकी 4 जणांची निवड पुणे येथील स्पर्धेसाठी केली जाईल. निवड झालेल्या मुलांना पुणे येथील स्पर्धेत प्रवेश फी फक्त 1000/- भरावी लागेल. त्यांची रहायची सोय तेथील आयोजकांमार्फत मोफत असणार आहे. सदर पुणे येथील स्पर्धा क्लासिकल फिडे रेटिंग असल्याने किडे मानांकन प्राप्त करता येईल. या स्पर्धेत डोनर एन्ट्री म्हणून पण भाग घेता येईल. सिंधुदुर्ग जिल्हा सर्कल निवड चाचणी मध्ये पहिल्या 4 क्रमांकांना ट्रॉफी व इतर उत्तेजनार्थ म्हणून मेडल्स देऊन स्पर्धकांना सन्मानित केले जाईल. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. सदर स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2026 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत राहील. तरी जिल्ह्यातील 19 वर्षाखालील (1 जानेवारी 2007 नंतरची जन्मतारीख असलेले सर्व मुले) मुला मुलींनी सहभाग घ्यावा असे सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क – सुयोग धामापूरकर – अध्यक्ष
मोबा-9404396216
श्रीकृष्ण आडेलकर – सचिव
मोबा -9422381949

error: Content is protected !!