ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत ५२.९९% मतदान; १४ गावांत शांततेत प्रक्रिया पूर्ण

ओरोस (प्रतिनिधी) : ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत मतदान पार पडले. मतदान झालेल्या एकुण १४ ग्रामपंचायतींमध्ये १२ हजार ७४३ मतदार पैकी ६ हजार ७५३ एवढया मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. ५२.९९ टक्के मतदान झाले आहे. सरपंच पदासाठी कुडाळ मधील कालेली ग्रामपंचायत मध्ये सर्वाधिक ५९.५१ टक्के मतदान झाले.

राज्यातील ग्रामपंचायतीतील सदस्य, थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ३१ जानेवारी २०२६ पर्यंत रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार एकुण १३ ग्रामपंचायतींमध्ये २८ एप्रिल २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडलेले आहे. यामध्ये थेट सरपंच निवडणूक पदांकरिता ५ ग्रामपंचायतींकरिता ११ उमेदवारांमध्ये निवडणूक लढत झाली. तसेच सदस्य पदाच्या पोट निवडणूकीसाठी ९ ग्रामपंचायतींकरिता २३ उमेदवारांमध्ये लढत झाली. निवडणूक प्रक्रिया मंगळवारी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० पर्यंत सुरळीत पार पडलेली असून, जिल्हयात एकुण ५२.९९ टक्के मतदान झालेले आहे.

सरपंच पदांच्या थेट निवडणूकित कणकवली मधील घोणसरीमध्ये ५२.९४ टक्के, मालवण मधील चौकेमध्ये ५७.६० टक्के, कुडाळ मधील कालेलीमध्ये ५९.५१ टक्के, सावंतवाडी मधील माजगांव मध्ये ४०.१२ टक्के याप्रमाणे मतदान झालेले आहे. तसेच सदस्य पदांकरिता निवडणूक कणकवली मधील दारिस्ते मध्ये ६१.७१ टक्के, तळेरेमध्ये ५९.१४ टक्के, मालवण मधील धामापूर मध्ये ५९.०६ टक्के, वराड मध्ये ७५.७३ टक्के, कुडाळ मधील गावराई मध्ये ५३.९४ टक्के, चेंदवण मध्ये ५७.२२ टक्के, रानबांबुळी मध्ये ६४.२६ टक्के, वेंगुर्ला मधील मठ मध्ये ६१.२४ टक्के, सावंतवाडी मधील नाणोस मध्ये ५६.४९ टक्के याप्रमाणे ग्रामपंचायंतींमध्ये सदस्य पदाकरिता मतदान झालेले आहे.

एकुण १४ ग्रामपंचायतींमध्ये १२ हजार ७४३ मतदार पैकी ६ हजार ७५३ एवढया मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. मतदान प्रक्रिये दरम्यान कुठेही मतदान यंत्र बदलणे किंवा कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. जिल्हयामध्ये सर्वत्र पोटनिवडणूकांकरिता मतदान शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडलेले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे मतदारांचे आभार मानण्यात आले आहेत. तसेच बुधवार २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजलेपासून मतमोजणी संबंधित तहसिलदार कार्यालय येथे होणार आहे.

error: Content is protected !!