जि. प सदस्या सुप्रिया मेस्त्री यांचा पोलिओ लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग

आशा ताईंसोबत स्वतः घरोघरी जाऊन केले पोलिओ लसीकरण

कणकवली (प्रतिनिधी) : प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेत पदाधिकारी अथवा लोकप्रतिनिधी उदघाटन करताना सर्वसाधारणपणे दिसतात. मात्र कलमठ जिल्हा परिषदचे सदस्य सुप्रिया मेस्त्री यांनी वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा ताईंसोबत घरोघरी जाऊन लसीकरण उपक्रमात स्वतः सक्रिय सहभाग घेतला.
प्राथमिक आरोग्य केंद्र वरवडे रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष आणि बाल कल्याण समिती सदस्य म्हणून माझी जबाबदारी असून आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे, आरोग्य केंद्रा बद्दल विश्वासहर्ता वाढवणे ही जिल्हा परिषद सदस्यां म्हणून माझी जबाबदारी आहे म्हणून आज आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत लसीकरण मोहिमेत सहभागी झाल्याचे सुप्रिया मेस्त्री यांनी सांगितले. आरोग्य सहाय्यक महेश आचरेकर, आरोग्यसेविका ऐश्वर्या कवठणकर,आशा संस्कृती गोठणकर, ज्योत्स्ना गुडेकर, प्राची पवार, विभावरी कांबळे, गवळी मॅडम. उपस्थित होते.

error: Content is protected !!