श्रीकांत चव्हाण, विनोद वळंजू, पप्पू कुडतरकर वर गुन्हा दाखल
देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मिठबाव गावातील वळंजू यांच्या कॉम्प्लेक्स मधील खोलीतून तब्बल 7 लाख 18 हजार 560 रुपयांची गोवा बनावटीची अवैध दारू एल.सी.बी सिंधुदुर्ग च्या पथकाने पकडली. याबाबत देवगड पोलीस ठाण्यात श्रीकांत चव्हाण (रा.मिठबाव, ता.देवगड), विनोद वळंजू (रा.देवगड), पप्पू कुडतरकर (रा. कुडाळ) या तिघांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 (ई), 81,83 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एस.पी डॉ दहिकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक साटम यांच्या सूचनेनुसार एल.सी.बी पी.आय प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई 30 जून रोजी रात्री 10 वाजता एल.सी.बी चे हवालदार विल्सन डिसोझा, हवालदार बस्त्याव डिसोझा, हवालदार आशिष जामदार, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती सावंत यांच्या पथकाने केली आहे.










