विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील धामापूर सडा येथील श्री मोरेश्वर गणपती मंदिर येथे उद्या बुधवार दि. २५ जानेवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी ६ वाजता श्री मोरेश्वर अभिषेक , सकाळी १० वाजता गणपती आरती , दुपारी १ वाजता महाप्रसाद , दुपारी ३ वाजता महिलांसाठी हळदीकुंकु , सायंकाळी स्थानिकांची भजने तसेच मान्यवरांचे सत्कार आणि सायंकाळी ७ वाजता हेळेकर दशावतार नाट्यमंडळ सावंतवाडी कारिवडे यांच्या पौराणिक नाट्यप्रयोग अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मोरेश्वर मित्रमंडळ धामापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.












