जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांचे गौरवोद्गार
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेची सामाजिक अर्थकारणात महत्वाची भूमिका आहे. सिंधुदुर्गसह राज्यस्तरावर वैश्य समाज पतसंस्थेचे काम लक्षणीय आहे. 35 वर्षांच्या कार्यकाळात 18 शाखांच्या माध्यमातून वैश्य समाज पतसंस्था स्थानिक लघु आणि मध्यम उद्योजकांना अर्थपुरवठा करून समाजात उद्योजक निर्माण करत आहे. ग्राहक आणि ठेवीदारांचे हित जोपासण्याला वैश्य समाज पतसंस्थेने प्रथम प्राधान्य दिले असल्याचे गौरवोद्गार जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी काढले. सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था मर्यादित फोंडाघाट च्या कणकवली येथील स्थलांतरित शाखेला डॉ. शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी पतसंस्था संचालक उमेश वाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वर पावसकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कणकवली सहाय्यक निबंधक श्री मारभळ, पतसंस्थेचे वसुली अधिकारी उदय मोदी, शाखाधिकारी गुरुदास सावंत, तसेच कर्मचारी उपस्थित होते.












