विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
बांदा (प्रतिनिधी) : रोणापाल ग्रामदैवत श्री देवी माऊली पंचायन मंदिराचा सुशोभीकरण सोहळा नुकताच संपन्न झाला असून त्यानिमित्त मंदिराचे शुद्धीकरण, संप्रोक्षण आणि हवनद्वारा नवचंडी अनुष्ठान सोहळा शनिवार २३ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ८ वाजता मंगलाचरण, प्रायश्चित्तविधी, संकल्प, महागणपती पूजन, पुण्याहवाचन, आचार्यवरण, स्थलप्राकार शुद्धी, देवता स्थापन, संप्रोक्षण विधी, सप्तशती पाठ वाचन, कुमारिका पूजन, ग्रहयज्ञ पाठ हवन आणि बलिदान विधी पार पडतील. दुपारी १२.१५ वा. महापूर्णाहुती, कुष्मांड बली, महानैवेद्य, महाआरती, मंत्रपुष्पांजली, प्रार्थना (गाऱ्हाणे), ब्राम्हण पूजन आणि आशिर्वाद ग्रहण व महाप्रसाद होईल. रात्री ८ वा. जय हनुमान दशावतार नाट्यमंडळाचा ‘ब्रम्ह कुंड परिक्रमा’ हा नाट्यप्रयोग होईल. सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली पंचायतन रोणापाल, समस्त ग्रामस्थ आणि गावकर मंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.









