काका केसरकर यांच्या कारला अपघात ; कारचे नुकसान

कणकवली (प्रतिनिधी) : बांधकाम व्यावसायिक काका केसरकर यांची कार ( MH 07 -AG – 6069 ) विजपोलाला धडकून अपघात घडला. अपघातात सुदैवाने कोणी जखमी झाले नसले तरी कार चा टायर फुटून कारचे दर्शनी भागाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात वरवडे फणसनगर मराठी शाळेजवळ आज दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास घडला. काका केसरकर आपल्या एक्स यू व्ही 300 कारमधून आचरा ते कणकवली च्या दिशेने येत होते. फणसनगर येथे कार आली असता चालकाचे ग्लानीत कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जात विजपोलला आदळली. अपघात घडल्यानंतर कारचा चालकाच्या दिशेकडील टायर फुटला. कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र कारचालक तसेच काका केसरकर यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!