मिठगवाणे येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) राजापूर तालुक्यातील मिठगवाणे गावी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी वृक्षारोपण कार्यक्रम तसेच स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. मिठगवाणे ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीम. आशा हरीभाऊ काजवे यांच्या उपस्थितीत पर्यावरणाला पूरक अशा वृक्षांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला कैलास कांबळी,विनायक पावसकर, चेऊलकर,महिला सदस्या सौ मेस्त्री,कांबळी,चव्हाण,काजवे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी गावातील महत्वाच्या ठिकाणी साफ सफाई व स्वच्छता करण्यात आली.तर अनेक वन औषधी व फळे फुले देणारी झाडे मान्यवरांच्या उपस्थितीत लावण्यात आली.



error: Content is protected !!