खारेपाटण किल्ले येथे शिवराज्यभिषेक दिन उत्साहात साजरा

” गड किल्ल्यांच्या संवर्धनातून छत्रपतींचा ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे…” — प्राची ईसवलकर

खारेपाटण (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी व येथील रयतेच्या कल्याणासाठी जिंकलेले गड किल्ले इतिहासाची साक्ष देतात.या गड किल्ल्यांच्या संवर्धनातून छत्रपतींचा वारसा आपण सर्वांनी जपला पाहिजे.असे भावपूर्ण उदगार जि.प.सदस्य प्राची ईसवलकर यांनी खारेपाटण येथील ऐतिहासिक किल्ल्यावर आयोजित करण्यात आलेल्या शिवराज्यभिषेक दीन कार्यक्रमात बोलताना काढले.

या कार्यक्रमाला खारेपाटण पं.स.सदस्य गुरुप्रसाद शिंदे,सरपंच महेंद्र गुरव माजी सरपंच रमाकांत राऊत,कुरंगवने सरपंच पप्पू ब्रम्हदंडे,शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव,गड किल्ले संवर्धन समितीचे कार्यकर्ते ऋषिकेश जाधव,ग्रा.पं.सदस्य सुधाकर ढेकणे,किरण कर्ले, जयदीप देसाई, क्षितिजा धुमाळे, अस्ताली पवार,खारेपाटण ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडेकर,प्रा.आ.केंद्र खारेपाटण वैद्यकीय अधिकारी डॉ प्रिया वडाम आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खारेपाटण किल्ला येथे शिवप्रतिमेचे पूजन सरपंच महेंद्र गुरव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.तर शिवशाहीर विजय कुमार वरवडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पोवाडा सादर करून महाराजांचा इतिहास जागृत केला.
यावेळी गड किल्ले संवर्धन समितीचे कार्यकर्ते दादा जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज व खारेपाटण किल्ला याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला खारेपाटण किल्ल्यावर मोठ्या संख्येने शिवप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.तर अंगणवाडी सेविका,अशा स्वयंसेविका तसेच आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विशाल वरवडेकर यांनी केले तर आभार श्री मंगेश गुरव यांनी मानले.

error: Content is protected !!