वाढत्या इंधन टंचाईविरोधात सायकल रॅली

कोल्हापूर : वाढत्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी Kaladiksha Dance N Fitness Studio यांच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. पर्यावरणपूरक वाहतुकीचा वापर वाढावा तसेच इंधन बचतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली.

या रॅलीमध्ये स्टुडिओचे स्टीव्हन पावलस सर यांच्यासह क्लासमधील महिला सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सायकलचा नियमित वापर केल्यास इंधनाची बचत होण्याबरोबरच आरोग्यही चांगले राहते, असा संदेश यावेळी देण्यात आला.

रॅलीदरम्यान सहभागी महिलांनी इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैली याबाबत जनजागृती केली. या उपक्रमाचे नागरिकांकडूनही स्वागत करण्यात आले.

error: Content is protected !!