तळेरे ग्रामपंचायतीच्या वतीने पर्यावरण संवर्धन तसेच स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धन तसेच स्वच्छतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन आज सकाळी करण्यात आले होते. या रॅलीला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. या सायकल रॅलीद्वारे गावातील नागरिकांमध्ये पर्यावरण व स्वच्छतेची जनजागृती करणे हाच उद्देश होता.

तळेरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच हनुमंत तळेकर आणि ग्रामपंचायत अधिकारी सौ.राजलक्ष्मी जाधव यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. तसेच सरपंच हनुमंत तळेकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन या रॅलीत सहभागी झाले होते. सदरची सायकल रॅली तळेरे ग्रामपंचायत कार्यालयापासून सुरू झाली ती एसटी बसस्थानक मार्गे संपूर्ण बाजारपेठेतून पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत काढण्यात आली.

यावेळी उपसरपंच संदीप घाडी, माजी उपसरपंच शैलेश सुर्वे, ग्रामपंचायत सदस्या सौ.प्राची चव्हाण, निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर, ग्रामपंचायत कर्मचारी आप्पा वरवडेकर, संतोष उर्फ बाबू मेस्त्री, सुनील कदम, नंदकुमार देसाई, रोहन मेस्त्री आदी सहभागी झाले होते.

या सायकल रॅलीद्वारे पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्त गाव, स्वच्छता राखण्याचे महत्त्व आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारे फलक सर्व सायकलींवरती लावण्यात आले होते. जेणेकरून नागरिकांमध्ये जनजागृती करुन स्वच्छतेचा आणि पर्यावरण संवर्धन व संरक्षण करण्याचा संदेश देण्यात आला.

error: Content is protected !!