कणकवली (प्रतिनिधी) : पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन असल्याने या निमित्त तरंदळे ग्रामपंचायत यांच्या वतीने “एक पेड माँ के नाम”हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.”आईच्या नावाने एक झाड,पर्यावरणासाठी मोठे योगदान! याच उद्देशाने आज तरंदळे ग्रामपंचायत यांच्या वतीने ग्रामपंचायत क्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी कणकवली पंचायत समिती सदस्य संजना राणे, तरंदळे सरपंच सुशिल कदम,उपसरपंच शुभावली सावंत,ग्रामपंचायत अधिकारी रेश्मा माळकर,ग्रामपंचायत सदस्य दीपक घाडीगांवकर,कृषी सेविका सोनिया चव्हाण,समुदाय आरोग्य विभाग अधिकारी विद्या रासम,माजी सरपंच जयसिंग नाईक, तंटा मुक्ती माजी अध्यक्ष डॉ.सत्यवान राणे,अनंत सावंत,रामनाथ सावंत,अमित सावंत,अमोल परब,आरोग्य सेवक गव्हाणे भाऊ, आशा स्वयंसेविका अनिता कदम,शुभांगी मुणगेकर,बचत गट crp प्रीती जाधव,कर्मचारी अभय सावंत,वनिता कदम,ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.














