फँड्री फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य रेनकोट वाटप

सोनाली मुंज-गिरकर यांच्या प्रयत्नातून बेळणे (खुर्द) शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाला मदतीचा हात

कणकवली (प्रतिनिधी) : फॅन्ड्री फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सोनाली अविनाश मुंज – गिरकर यांच्या विशेष प्रयत्नातून बेळणे खुर्द प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य आणि रेनकोटचे वाटप करण्यात आले. यावेळी बेळणे खुर्द गावचे सरपंच अविनाश गिरकर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र चाळके प्रशालेच्या मुख्याध्यापिका वालावलकर मॅडम, मुसळे मॅडम, स्वप्नाली चाळके आदी उपस्थित होते, उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध झाले, तसेच पावसाळ्यात सुरक्षितपणे शाळेत ये-जा करण्यासाठी रेनकोटचाही लाभ मिळाला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच या उपक्रमाची खरी प्रेरणा आहे. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल फॅन्ड्री फाउंडेशन, मुंबई आणि सोनाली मुंज गिरकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!