सावंतवाडी (प्रतिनिधी) : बांदा फिटनेस योग फाउंडेशनच्या वतीने आयोजित योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मंगळवार दि. 30 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता जिमखाना हॉल, सावंतवाडी येथे उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले उपस्थित होत्या. आपल्या भाषणात त्यांनी योगाचे महत्त्व विशद करून तरुणांनी योगाकडे वळावे असे आवाहन केले. याप्रसंगी योगशिक्षक शेखर बांदेकर, नगरसेविका सीमा नाईक, फिटनेस योग अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष शैलेश बांदेकर, फिटनेस महिला अकॅडमीच्या जिल्हाध्यक्षा रसिका सावंत, ‘कोकणसाद’चे चिप रिपोर्टर विनायक गवस, एकनाथ पाटील सर व रश्मी बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात शेखर बांदेकर यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. महर्षी पतंजलींच्या योगसूत्रांवर आधारित शिस्तबद्ध प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. हिरकणी, महालक्ष्मी, वटसावित्री, एकमुखी दत्तमंदिर वाटवे हॉल या फिटनेस योग फाउंडेशनच्या 5 योगवर्गातील योगशिक्षक व साधक या शिबिरात सहभागी झाले होते. या शिबिराचा लाभ योगाभ्यास प्रेमींनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल लातये सर यांनी केले, तर आभार रवींद्र प्रभुदेसाई यांनी मानले.










