सावंतवाडीतील औदुंबर स्वामी मंदिरात उद्या स्वामी पादुकांचे आगमन

अनिल आसोलकर यांच्या निवासस्थानी भाविकांना घेता येणार पादुकादर्शन

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ समाधी मंदिर परम स्वामीभक्त चोळप्पा महाराज यांचे निवासस्थान येथील स्वामींच्या पादुकांचे उद्या सावंतवाडीत आगमन होणार आहे. या निमित्ताने सावंतवाडी पोलीस लाईन येथील श्री औदुंबर स्वामी मंदिरात सायंकाळी सात वाजता दाखल होणार आहेत. तत्पूर्वी मायानगरी कोलगाव येथील अनिल आसोलकर यांच्या निवासस्थानी सायंकाळी सहा वाजता या पादुकांचे दर्शन घेता येणार आहे. अक्कलकोट येथील प. योगेंद्र नारायण पुजारी (४ थे वंशज गुरुजी) यांच्या विशेष उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार आहे. त्यांच्याच उपस्थितीत या ठिकाणी महापूजन केले जाणार असून स्वामींच्या पादुका दर्शनाचा लाभ सर्वांना घेता येणार आहे. तसेच, सावंतवाडीतील स्वामी भक्तांसाठी या पवित्र पादुका सावंतवाडी पोलीस लाईन येथील श्री औदुंबर स्वामी मंदिरातही दर्शनासाठी आणल्या जाणार आहेत. त्यामुळे सावंतवाडी शहर आणि परिसरातील हजारो स्वामी भक्तांना या दिव्य पादुकांचे दर्शन घेण्याची अभूतपूर्व संधी लाभणार आहे. तरी सर्व भाविकांनी, मित्रमंडळींनी आणि सहपरिवाराने या महापूजन, पवित्र पादुका दर्शन तसेच तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन औदुंबर स्वामी मंदिर उत्सव समितीकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!