सिंधुदुर्ग जिल्हा शास. निमशासकीय कर्मचारी सह. पतपेढी मर्या. सिंधुदुर्ग तर्फे गुणवंत सभासद पाल्यांचा गुणगौरव व सेवानिवृत्त सभासदांचा सन्मान सोहळा

तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा शास. निमशासकीय सह. बँक इ. कर्मचारी सह. पतपेढी मर्या. सिंधुदुर्ग कुडाळची सन २०२५-२६ तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.३० वा. मराठा समाज एसी हॉल कुडाळ येथे अध्यक्ष राजेश कुडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. संस्थेतर्फे सभासद पाल्यांचा गुणगौरव व सेवानिवृत्त सभासदांचा सन्मान सोहळा होणार आहे. संस्था सभासद पाल्य सन २०२५-२६ दहावी परीक्षेमध्ये ७५ टक्के व त्यापेक्षा जास्त गुण, बारावी परीक्षेमध्ये ६५ टक्के व त्यापेक्षा जास्त गुण, पूर्व उच्च प्राथमिक, पुर्व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक विदयार्थी तसेच पदवीधर, उच्च पदवीधर, UPSC, MPSC, राज्य स्तरीय व राष्ट्रस्तरीय स्पर्धेत यश मिळविलेल्या विविध स्पर्धेतील पाल्यांचा तसेच शासकीय जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले सन्मानिय सभासद यांचा गुणगौरव होणार आहे. तरी संस्था सभासदांनी आपल्या पाल्यांची नावे, एक फोटो व गुणपत्रकाची झेरॉकस प्रत तसेच शासकीय पुरस्कार प्राप्त सभासदांनी सर्टिफिकेट प्रत शुक्रवार दिनांक ३१ जुलै २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत संस्था कार्यालय कुडाळ अगर शाखा कार्यालय कासार्डे येथे (मो. नं.९१४५०६५५५१) आणून देण्याचे आवाहन संस्था अध्यक्ष राजेश कुडाळकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!