आदर्श जाधव जिल्ह्यात चौथा
कासार्डे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) परीक्षा 22 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आली सदर परीक्षेमध्ये कासार्डे माध्यमिक विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये आदर्श दीपक जाधव जिल्ह्यात 4 था, अजहर जाकीर शेख जिल्ह्यात 17 वा व कैवल्य अतुल मुंडले जिल्ह्यात 58 वा आला आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विभाग प्रमुख सविता जाधव, मार्गदर्शक शिक्षक अनंत काणेकर, विधी मुद्राळे, यशवंत परब ,रामचंद्र राऊळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या गुणवंत विद्यार्थ्यांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे सर्व पदाधिकारी,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बी. बी. बिसुरे, पर्यवेक्षक एस.व्ही राणे यांच्यासह सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

१.आदर्श जाधव

२. अजहर शेख

३. कैवल्य मुंडले










