नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवशी विकास कामांच्या भूमिपूजनाची मांदियाळी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीच्या नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा 14 जुलै रोजी वाढदिवस विविध विकास कामांच्या भूमिपूजनांनी साजरा केला जाणार आहे नगरपंचायत च्या वतीने संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त एकूण सात विकास कामांचे भूमिपूजन 14 जुलै रोजी केले जाणार असून संदेश परकर यांनी कणकवली शहराच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून तब्बल चार कोटी 92 लाख 87 हजार 295 रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.

उद्या १४ जुलै रोजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली नगरपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.त्यात कणकवली नगरपंचायत हद्दीतील बगीचा सुशोभीकरण व पायाभूत सुविधा निर्माण करणे.1,21,79,609/-,कणकवली नगरपंचायत हद्दीतील बिजलीनगर हिर्लेकर सर्व्हिसिंग सेंटर नजीक काँक्रीट गटर बांधकाम करणे.11,41,950/-,कणकवली नगरपंचायत हद्दीतील टेंबवाडी येथील नवीन रस्त्याला सोलर पथदीप व्यवस्था करणे.9,98,973/-,कणकवली नगरपंचायत हद्दीतील विविध ठिकाणी सोलार हायमास्ट बसविणे.19,99,505/-,कणकवली नगरपंचायत आरक्षण 27 व 28 क्रिडा सुविधा केंद्र येथे वुडन कोर्ट करून मॅट बसविणे.24,64,923/,कणकवली नगरपंचायत हद्दीतील मराठा मंडळ येथे गणेश घाट बांधणे
55,65,895,

तसेच सिद्धार्थनगर कांबळे घराशेजारी आर.सी.सी सार्वजनिक विहीर बांधणे 16,21,780/-,कणकवली नगरपंचायत हद्दीतील गणपती साना कांदळकर घर ते कला महाविद्यालय पर्यंत गटर बांधकाम करणे (दोन्ही बाजूने)29,56,893/-,कणकवली नगरपंचायत हद्दीतील माऊली नदी परिसर सुशोभीकरण करणे 42,43,978/-,कणकवली नगरपंचायत सभागृह व परिसर नुतनीकरण करणे.40,23,597/-, कणकवली नगरपंचायत हद्दीतील परबवाडी संतोष सावंत घर ते जुन्या नरडवे रस्त्यापर्यत फुटपाथ व गटर बांधकाम करणे. 26,74,783/-,कणकवली नगरपंचायत हद्दीतील रिंग रोड फेज 2 व 1 येथे सोलार पथदिप व्यवस्था करणे. 34,79,962/-, कणकवली नगरपंचायत हद्दीतील जळकेवाडी स्मशानभूमी येथे संरक्षक भिंत व शेडचे बांधकाम व इतर अनुषंगिक करणे 39,57,316/- आदी.उर्वरित कामे टप्प्या टप्प्याने केली जाणार आहेत

error: Content is protected !!