इंग्लिश इंटरनॅशनल ऑलिंपियाड परीक्षेत आयडियल इंग्लिश स्कूलच्या कु.गंधार हेमंत पाटकर चे राज्यस्तरावर यश

कणकवली (प्रतिनिधी) : इंडियन टॅलेंट ओलंपियाड यांच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये इंग्लिश इंटरनॅशनल ओलिंपियाड या परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज कॉमर्स आणि सायन्स वरवडे या प्रशालेच्या इयत्ता दुसरीचा विद्यार्थी कु.गंधार हेमंत पाटकर याने इंग्लिश इंटरनॅशनल ओलिंपियाड या परीक्षेत राज्यात बारावा क्रमांक पटकावला आहे. त्याला एक्सलन्स अवॉर्ड देऊन गोल्ड मेडल आणि प्रशस्तीपत्रकाने सन्मानित करण्यात आले . या यशाबद्दल त्याचा नुकताच ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल,आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई तसेच आयडियल इंग्लिश स्कूलचे कोऑर्डिनेटर निलेश घेवारी यांच्या उपस्थितीत त्याचा सन्मान करण्यात आला

या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे सर, उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष बुलंद पटेल सर,संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्राध्यापक निलेश महेंद्रकर सर,खजिनदार सौ. शितल सावंत मॅडम,सल्लागार डी. पी.तानावडे सर आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे

error: Content is protected !!