खासदार विनोद तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘बांधावरची शेती’ उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने उपक्रमाचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : खासदार विनोद तावडे यांच्या वाढदिवसानिमित्ताचे औचित्य साधत वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयामार्फत करुळ येथे तीर्थराम गुरव यांच्या शेतात‘बांधावरची शेती’ हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आत्मीयता निर्माण करणे, आधुनिक व सेंद्रिय शेतीचे महत्त्व समजावून सांगणे, श्रमसंस्कार रुजविणे तसेच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र दत्ताराम रावराणे यांनी स्वतः ट्रॅक्टरचे स्टेअरिंग हाती घेत विद्यार्थ्यांसमोर श्रमसंस्काराचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी उत्सुकता निर्माण झाली आणि ‘कृतीतून शिक्षण’ या संकल्पनेचा सुंदर अनुभव सर्वांना मिळाला.

या उपक्रमात संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे सह प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस नादकर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ विद्यार्थ्यांचा कृतिशील सहभाग दिसून आला. यावेळी करूळ गावचे सरपंच नरेंद्र कोलते बाबाजी कदम, करुळ विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक मंगेश घाडी, यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमाची प्रतिष्ठा, शेतीबद्दल आदर, पर्यावरणाविषयी संवेदनशीलता आणि ग्रामीण जीवनाशी नाळ जोडण्याची भावना अधिक दृढ झाली. अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरत असून त्यांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!