विद्यार्थ्यांनी बदलत्या शैक्षणिक धोरणाचा अवलंब करावा – प्रकाश सणस

कुर्ली हायस्कूलमध्ये अरुण पाटील यांच्या सौजन्याने मोफत छत्री वाटप

वैभववाडी (प्रतिंनिधी) : स्पर्धेचे युग आहे, विद्यार्थ्यांनी बदलत्या शैक्षणिक पद्धतीनुसार दर्जेदार शिक्षण घेऊन भविष्यात नोकरी किंवा व्यवसाय करणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन  एल आय सी ऑफ इंडिया मुंबई चे सेवा निवृत्त अधिकारी प्रकाश सणस यांनी केले. कुर्ली माध्यमिक विद्यालय, कुर्ली येथे आयोजित मोफत छत्री वाटप कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. या वेळी एल आय सी सी ऑफ इंडिया चे अधिकारी अरुण पाटील, कुर्ली उत्कर्ष मंडळ मुंबई चे माजी अध्यक्ष प्रकाश सावंत, मुंबई येथील जयेश बेंडकुळे, संतोष तुळसनकर,संजय माने, कुर्ली उपसरपंच अंबाजी हुंबे, माजी सरपंच सूर्यकांत पाटील, शाळा समिती सदस्य प्रशांत पाटील,अमित चव्हाण, कुर्ली हायस्कूल च्या मुख्याध्यापक विशाखा कांबळे, शिक्षिका श्रीमती पाटील, सेवा निवृत्त शिक्षक शिवाजी बरकडे, खडकदरा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल खांबल, कुर्ली केंद्र शाळेचे  शिक्षक विलास राठोड, शिक्षिका जांभुर्णे, कर्मचारी रमेश सकपाळ, दत्ताराम झोरे, दिनकर धूम, हेमंत फोंडेकर व विध्यार्थी उपस्थित होते.

जयेश बेंडकुळे म्हणाले, शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना अरुण शिवराम पाटील यांच्या सौजन्याने गेली अनेक वर्षे  शैक्षणिक साहित्य व मोफत छत्री वाटप करून आपल्या गावातील शेतकऱ्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करत असतात.त्यांचे कौतुक करणे  गरजेचे आहे, विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण घेऊन आपले व आपल्या गावचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले. या वेळी कुर्ली हायस्कूल, खडकदरा प्राथमिक शाळा,कुर्ली केंद्र शाळा नंबर 1 च्या विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप केले. यावेळी प्रकाश सावंत, अरुण पाटील, मोहन पडवळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक श्रीमती कांबळे यांनी केले, त्याच प्रमाणे उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन  स्वागत केले.तर आभार अमित चव्हाण यांनी मानले.

error: Content is protected !!