मालवण (प्रतिंनिधी) : भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती सतिश उर्फ राजू परुळेकर यांच्या मातोश्री व पं.स.सदस्या सीमा परुळेकर यांच्या सासू शालिनी दामोदर परुळेकर यांचे मंगळवारी १४ जुलै रोजी रात्री ८.३० वा. च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, ५ मुली व नातवंडे असा परिवार आहे. सध्याच्या युगामध्ये लोप पावत चाललेल्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये परुळेकर कुटुंबाला एकत्र ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. परिसरात मास्तरीण या नावाने त्या प्रसिद्ध होत्या.
माजी पं. स. उपसभापती राजू परुळेकर यांना मातृशोक











