सावडाव धबधब्याच्या निसर्गरम्य वातावरणात पत्रकार कुटुंबियांचा आनंद द्विगुणीत

सावडाव धबधब्यावर कौटुंबिक स्नेहमेळावा व पर्यटन सफर उत्साहात ; कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे सर्वांनी केले कौतुक

कणकवली (प्रतिनिधी) : सावडाब धबधबा येथील निसर्गरम्य वातावरण, धबधब्याचा मनमोहक नजारा आणि कुटुंबीयांचा उत्स्फूर्त सहभाग अशा आनंददायी वातावरणात कौटुंबिक स्नेहमेळावा व पर्यटन सफर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पत्रकार व पत्रकारांचे कुटुंबिय विविध वयोगटातील सदस्यांनी या कार्यक्रमात सहभागी होत आनंददायी क्षण अनुभवले. सावडाव धबधब्याचा आनंद लुटत मौजमजा, मस्ती केल्याने पत्रकार कुटुंबियांचा आनंद द्विगुणीत झाला होता. शेवटी डिजेच्या तालावर झिंगझिंग झिंगाट यासह विविध गाण्यावर ठेका धरत या कौटुंबिक स्नेह मेळाव्याची सांगता झाली.

कणकवली तालुका पत्रकार संघ आयोजित सावडाव धबधबा येथे कौटुंबिक स्नेहमेळावा व पर्यटन सफर कौटुंबिक स्नेहमेळावा व पर्यटन सफर कार्यक्रमाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर , परिषद प्रतिनीधी गणेश जेठे ,सचिव बाळ खडपकर , तालुका संघाचे अध्यक्ष भगवान लोके , सावडाव सरपंच आर्या वारंग , उपसरपंच दत्ता काटे, सचिव संजय सावंत , खजिनदार रोशन तांबे ,जिल्हा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे , माजी अध्यक्ष रमेश जोगळे , अजित सावंत, चंद्रशेखर देसाई , महेश सरनाईक, सुधीर राणे , उमेश बुचडे , दर्शन सावंत, नितीन कदम, विशाल रेवडेकर, तुषार हजारे , तुषार सावंत, उत्तम सावंत, भाई चव्हाण , संजय बाणे , मानिक सावंत, उल्का तावडे , रंजिता तहसिलदार,संजय पेटकर व वनविभागाचे वनपाल सारिक फकीर , वनरक्षक अमोल पटेकर , अंकुश माने , स्वाती व्हनवडे, शुभम पाटील यांच्यासह तालुक्यातील पत्रकार व पत्रकारांचे कुटुंबिय , कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या पर्यटन सफर कार्यक्रमासाठी स्नेहभोजनाचा खर्च करत योगदान दिल्याबद्दल जिल्हा उपाध्यक्ष संतोष राऊळ यांचा शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर म्हणाले, कणकवली तालुका पत्र संघ नेहमीच आदर्शवत उपक्रम राबवत आहे. ख-या अर्थाने कौटुंबिक स्नेहमेळावा ही संकल्पना कणकवली तालुका पत्रकार संघाने राबवली.असे अनेक उपक्रम आहेत जे कणकवलीत पहिल्यांदा राबवले जातात. त्यानंतर जिल्हा पत्रकार संघ त्यानंतर इतर संघ ते उपक्रम राबवतात , ही वस्तुस्थिती आहे. तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके व त्यांचे सहकारी अत्यंत स्तुत्य असा उपक्रम निसर्गरम्य सावडाव धबधब्यावर आयोजित केला, हे कौतुकास्पद आहे. कणकवली तालुक्याची एकजुट मात्र कायम राहावी. भविष्यात पत्रकार कुठेही कमी पडणार नाही.

परिषद प्रतिनिधी गणेश जेठे म्हणाले, कणकवली तालुका पत्रकार संघाचे सामाजिक बांधीलकीचे उपक्रम चांगले आहेत. त्यानिमित्ताने सर्वजण एकत्रित आले आहेत. सर्वजण या कार्यक्रमातून एकजूट दिसत आहेत.
उपाध्यक्ष संतोष राऊळ म्हणाले, पत्रकार संघ नेहमीच सामाजिक बांधिलकीचे वेगळेपण जपत उपक्रम राबवित आहे. कुटुंबियांसाठी हा कार्यक्रम आयोजित करुन एक आदर्श निर्माण केला आहे. यापूर्वी अनेक कार्यक्रम पहिल्यांदा कणकवलीत झाले, त्यानंतर इतर ठिकाणी होतात.
अध्यक्ष भगवान लोके म्हणाले, कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने हा कौटुंबिक स्नेहमेळावा व पर्यटन सफर हा नाविण्यपूर्ण उपक्रम यावर्षी राबवण्यात आला. एखाद्या पर्यटन स्थळावर असा कार्यक्रम घेणे कठीण होते. तरीदेखील गेल्या महिन्याभरापासून या कार्यक्रमाबाबत नियोजनवृत्त्या मी आणि माझ्या सहका-यांनी मेहनत घेतल्याने हा कार्यक्रम यशस्वी होत आहे. त्यातून पत्रकार आणि त्यांचे कुटुंबिय एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येतात एकजूट निर्माण होते. यावेळी सरपंच आर्या वारंग व उपसरपंच दत्ता काटे , वनविभागाचे वनपाल सारिक फकीर यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आभार सचिव संजय सावंत यांनी मानले.

पत्रकार कौटुंबिक स्नेहमेळाव्यातून स्नेहबंध अधिक दृढ
त्यानंतर फनी गेम्स मध्ये 3 गटांत संगीत खुर्ची , महिलांसाठी बादलीत बॉल टाकणे, कराओके ट्रॅकवर गायन, चिमुकल्यांसाठी क्रिकेट ,शेवटी एकत्रित ग्रुप रेन डान्स घेण्यात आले.या स्नेहमेळाव्यात महिलांसाठी, पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सावडाव धबधब्याच्या परिसरात सामूहिक पर्यटनाचा आनंद लुटण्यात आला. हिरवाईने नटलेल्या परिसरात कुटुंबीयांनी छायाचित्रे काढत आणि एकमेकांशी संवाद साधत स्नेहबंध अधिक दृढ केले. यावेळी उपस्थितांनी सामूहिक भोजनाचा आस्वाद घेतला. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, गाणी, विनोद आणि मनोगतांमुळे कार्यक्रमात रंगत आली.

error: Content is protected !!