डॉ. सतीश पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन
कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद केंद्र शाळा श्री मारुती विद्यामंदिर जानवली-वाकडवाडी येथे गुरुवार दिनांक 26 जानेवारी, 2023 रोजी प्रजासत्ताकदिनी प्रशालेचे स्नेहसंमेलन संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी कॉमन पूल, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, सिंधुदुर्ग विज्ञान पर्यवेक्षक प्रेरणा प्रदीप मांजरेकर उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून डॉ. सतीश सदाशिव पवार आणि शुभांगी सदाशिव पवार यांची उपस्थिती असणार आहे. सोबतच जानवली पोलीस पाटील मोहन सावंत, शिक्षण विस्तार अधिकारी हुंबरट प्रभाग कैलास राऊत, जानवली केंद्रप्रमुख के. एन. पवार हे उपस्थित असणार आहेत. सायंकाळी ७.०० वाजता उद्घाटन आणि शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी या स्नेहसंमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक शंकर बागवे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विक्रम मुंबरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिशा राणे तसेच सर्व शिक्षक वृंद आणि व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.












