कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर,गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ सिनेमा आज प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शने, आंदोलने झाली आहेत. यासाठी आज प्रदर्शनामध्ये कोणताही अणसावध प्रकार घडू नये यासाठी कोल्हापुरातील भाजप शहर उपाध्यक्ष सचिन तोडकर यांना पोलिसांनी नोटीस दिली आहे.











