खारेपाटण येथे चिमुकल्यांच्या वतीने काढण्यात आली आषाढी एकादशी निमित्त दिंडी

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथे आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिशुविहार व प्राथमिक विभागाच्या शालेय विद्यार्थ्यांनी खारेपाटण हायस्कूल ते खारेपाटण बाजारपेठ अशी पायी विठुरायाचा गजर करत दिंडी काढली. खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागाच्या या चिमुकल्या विद्यार्थ्यानी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विठु रुकमाईच्या वेशात तुळशीपात्र डोक्यावर घेतलेली महिला व खांद्यावर माऊलीची सजवलेली पालखी आणि वारकरीच्या गणवेशात टाळ मृदुंगाच्या तालावर व ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, पंढरी का वर्दे हरी विठ्ठल…. चा जयघोष करीत काढलेली दिंडी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षका काझी मॅडम, गुरव मॅडम, हरयान मॅडम यांनी देखील या दिंडी मध्ये सहभाग घेतला होता. खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे व खारेपाटण हायस्कूल – ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य संजय सानप सर यांनी या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

error: Content is protected !!