कणकवली (प्रतिनिधी) : ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे आणि डॉ. राजअहमद हुसेनशाह पटेल चॅरिटेबल ट्रस्ट हरकुळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने “श्रावणधारा” जिल्हास्तरीय मराठी सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा तीन गटांमध्ये होणार असून पहिला गट इयत्ता 5 वी ते 8 वी , (वयोगट 11 ते 14 वर्षे) गट दुसरा इयत्ता 9 वी ते 12 वी (वयोगट 15 ते 18 वर्ष ) व तिसरा खुला गट.
या तिन्ही गटांमधून प्रथम तीन क्रमांकांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, तर उत्तेजनार्थ एका क्रमांकास चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. सदर स्पर्धा ही एकल गायन स्पर्धा असून या स्पर्धेसाठी स्पर्धक भावगीत, भक्तीगीत, गझल, किंवा अभंग यापैकी कोणतेही एक प्रकारचे गीत सादर करू शकतात. या स्पर्धेची प्रारंभिक फेरी, प्रथम फेरी रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 ते 1.00 या वेळेत तर अंतिम फेरी शनिवार दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजता आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी दिनांक 20 ऑगस्ट 2026 पर्यंत खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर करावी.
9537995001/9890520888/9890267138/8380053641/7666495370.
तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.












